Available age groups
तुषार भारतीय
मी तुषार भारतीय, तुमच्याशी संवाद साधत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय "अटल दौड" आयोजित केली आहे. मात्र, यावर्षी विशेष पर्व आहे, कारण अटलजींची शंभरावी जयंती आहे.
ही स्पर्धा फक्त धावण्यापुरती मर्यादित नाही, तर अटलजींच्या विचारांशी, त्यांच्या प्रेरणादायी जीवनाशी आणि आपल्या स्फूर्तीशक्तीशी जोडलेली आहे.
तुमच्या सहभागासाठी आम्ही उत्सुक आहोत!
चला, या खास प्रसंगी एकत्र येऊया, धावूया आणि अटलजींच्या विचारांना पुन्हा एकदा जिवंत करूया.
तुम्हाला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहे.
TIME TABLE
श्री गुरुकुल शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित अटल दौड ही एक अमरावतीमध्ये दरवर्षी होणारी हाफ मॅरेथॉन आहे. ही दौड मॅरेथॉन स्पर्धा भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी त्यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ घेण्यात येते. यामध्ये वय वर्ष १४ चे मुलं मुली ते वय वर्ष 40+ च्या वरचे महिला व पुरुष असे विविध गटांमध्ये अमरावतीकरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी आहे.
केवळ ३ किलोमीटरची छोटी धाव. ऑनलाईन नोंदणी आवश्यक..हाफ मॅरेथॉन
पुरुष गटात प्रथम बक्षीस - मोटर सायकल
महिला गटात प्रथम बक्षीस - स्कूटर
एकूण ४ लक्ष रुपयांची बक्षिसे
Mobirise