श्री गुरुकुल शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित अटल दौड 2026

2026 नोंदणी लवकरच सुरू होणार.

वेबसाइटला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार.

वाटप केवळ आज होईल, वेळेवर BIB जर्सी वाटप होणार नाहीं

राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन | शुक्रवार, 25 डिसेंबर 2026 | अमरावती

Prizes not for other state participants

स्पर्धा मार्ग व अन्य तपशीलाकरिता कार्यालयाशी संपर्क करावा

धावकांनी गुरुवार दिनांक २५ डिसेंबर 2026 सकाळी ५.३० वाजता रिपोर्टिंग करावे

अटल दौड बद्दल

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 25 डिसेंबर रोजी अमरावती येथे आयोजित होणारी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे उद्देश . अटलजींच्या विचारांना, कर्तृत्वाला आणि सार्वजनिक जीवनातील आदर्शांना अभिवादन नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि क्रीडा संस्कृती वाढवणे युवकांना प्रेरणा देणे सामाजिक एकता आणि सहभाग वाढवणे

.

ठिकाण: दशहरा मैदान, अमरावती

रिपोर्टिंग वेळ: सकाळी 5:30 वाजता

आयोजक: श्री गुरुकुल शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटना

एकूण ७ लाखांपर्यंतची बक्षिसे, फिनिशर मेडल, जर्सी आणि सर्टिफिकेट सर्व सहभागींना!

Atal Bihari Vajpayee

मागील स्पर्धांची झलक

Slide 1

स्पर्धा व बक्षिसे ठरलेल्या नियमानुसार होईल , स्पर्धा पंचाचा निर्णय अंतिम व बांधील राहील

Atal Daud Prizes
Atal Bihari Vajpayee

मुख्य आयोजक

Tushar Bhartiya

तुषार भारतीय

मुख्य आयोजक

आवाहन

दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय "अटल दौड" आयोजित केली आहे. मात्र, यावर्षी विशेष पर्व आहे, कारण अटलजींची शंभरावी जयंती आहे. ही स्पर्धा फक्त धावण्यापुरती मर्यादित नाही, तर अटलजींच्या विचारांशी, त्यांच्या प्रेरणादायी जीवनाशी आणि आपल्या स्फूर्तीशक्तीशी जोडलेली आहे. तुमच्या सहभागासाठी आम्ही उत्सुक आहोत! चला, या खास प्रसंगी एकत्र येऊया, धावूया आणि अटलजींच्या विचारांना पुन्हा एकदा जिवंत करूया. तुम्हाला मैदानावर पाहण्यास उत्सुक आहे.

अमरावतीच्या प्रत्येक नागरिकाने या उत्सवात सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे.

एकूण १३ स्पर्धा. स्वच्छ सुंदर व सुरक्षित अमरावती साठी RUN FOR AMRAVATI

१४ वर्षांखालील

मुले-मुली

अंतर: ३ किमी

१६ वर्षांखालील

मुली: ३ किमी

मुले: ५ किमी

२० वर्षांखालील

मुली: ५ किमी

मुले:८ किमी मी

४० वर्षांवरील

महिला व पुरुष

अंतर: ५ किमी

रन फॉर अमरावती

खुला वर्ग

अंतर: ३ किमी

हाफ मॅरेथॉन

खुला वर्ग

१० किमी

२१ किमी

आकर्षक बक्षिसे

पुरुष गटात प्रथम

मोटर सायकल

महिला गटात प्रथम

स्कूटर

एकूण बक्षिसे

७ लाखांपर्यंत

सर्व सहभागींना

मेडल, जर्सी, सर्टिफिकेट

अटल दौड ची व्हिडियो झलक

ताज्या घोषणा व बातम्या

स्पर्धा नियम

सामान्य नियम

  • सर्व सहभागींनी निर्धारित वेळेत रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे (सकाळी 5:30 वाजता)
  • नोंदणीच्या वेळी वैध ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे
  • BIB नंबर स्पष्टपणे छातीवर लावणे आवश्यक आहे
  • प्रत्येक सहभागी स्वतःच्या जोखमीवर स्पर्धेत भाग घेत आहे
  • आयोजकांचे निर्णय अंतिम आणि सर्वांना बंधनकारक राहतील

आरोग्य आणि सुरक्षा

  • सहभागींनी स्पर्धेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे
  • हृदयविकार, रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असल्यास भाग घेऊ नये
  • स्पर्धेदरम्यान अस्वस्थ वाटल्यास लगेच थांबावे
  • मार्गावर वैद्यकीय सहाय्य उपलब्ध असेल
  • पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे

मार्ग नियम

  • निर्धारित मार्गाचे काटेकोरपणे पालन करावे
  • शॉर्टकट वापरणे किंवा मार्ग सोडणे प्रतिबंधित आहे
  • सर्व चेकपॉईंट्सवरून जाणे आवश्यक आहे
  • इतर धावपटूंना मार्ग देणे आणि शिस्त राखणे आवश्यक आहे
  • कचरा फेकणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे - स्वच्छता राखावी

बक्षीस नियम

  • बक्षिसे फक्त प्रथम तीन स्थान मिळवणाऱ्यांना दिली जातील
  • बक्षिसे मिळवण्यासाठी संपूर्ण अंतर पूर्ण करणे आवश्यक आहे
  • अपात्र ठरल्यास बक्षीस रद्द केले जाईल
  • सर्व सहभागींना फिनिशर मेडल, सर्टिफिकेट मिळेल
  • बक्षीस वितरण समारोहाला उपस्थित राहणे आवश्यक आहे

प्रतिबंधित गोष्टी

  • कोणत्याही प्रकारचे डोपिंग किंवा प्रतिबंधित पदार्थ वापरणे
  • वाहनाचा वापर करून अंतर कमी करणे
  • दुसऱ्याच्या BIB नंबरचा वापर करणे
  • स्पर्धेदरम्यान हेडफोन/ईअरफोन वापरणे
  • मार्गावर धूम्रपान किंवा मद्यपान करणे

स्पर्धा मार्ग

  • विविध गटा साठी असलेले स्पर्धा मार्ग स्पर्धे आधी जाहीर करण्यात येतीले
  • स्पर्धा पूर्ण न केल्यास DNF (Did Not Finish) घोषित केले जाईल

अटी व शर्ती

1. नोंदणी आणि शुल्क

नोंदणी शुल्क एकदा भरल्यानंतर परत करण्यात येणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही. नोंदणीच्या वेळी दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असणे आवश्यक आहे.

  • नोंदणी शुल्कामध्ये BIB नंबर, जर्सी, फिनिशर मेडल, सर्टिफिकेट आणि रिफ्रेशमेंट समाविष्ट आहे

2. वयोमर्यादा आणि पात्रता

प्रत्येक स्पर्धा वर्गासाठी विशिष्ट वप्रत्येक स्पर्धा वर्गासाठी विशिष्ट वयोमर्यादा आहे, आपल्या वायोमार्यादेमध्ये भाग घेणे. वयाबद्दल आयोजकांना शंका आल्यास आपला सहभाग रद्द केला जाऊ शकतो व श्या परिस्थितीत कोणतेही बक्षिस , प्रमाणपत्र व मेडल दिल्या जाणार नाही' वय २५ डिसेंबर २०२५ रोजी मोजली जाईल. अवयस्क सहभागींसाठी पालकांची परवानगी आवश्यक आहेयोमर्यादा आहे. े.

  • हाफ मॅरेथॉन (21 किमी): किमान 18 वर्षे
  • 10 किमी धाव: किमान 16 वर्षे
  • 5 किमी धाव: किमान 14 वर्षे
  • 3 किमी धाव (मुले 10-14 वर्षे
  • रन फोर अमरावती - खुला गट, वय मर्यादा अथवा किमान वय नाही . लहान मुलांसोबत पालक असणे आवश्यक त्यांची सुरक्षा हि पालकांची जबाबदारी

3. जबाबदारी आणि दायित्व

सहभागी स्वतःच्या जोखमीवर स्पर्धेत भाग घेत आहात. आयोजक कोणत्याही दुखापती, अपघात, नुकसान किंवा मृत्यूसाठी जबाबदार राहणार नाहीत. सहभागींनी आपले आरोग्य विमा स्वतः करून घेणे आवश्यक आहे.

4. छायाचित्रे आणि व्हिडिओ

स्पर्धेदरम्यान घेतलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्धीसाठी आणि प्रचारासाठी वापरले जाऊ शकतात. नोंदणी करून, तुम्ही याला संमती देत आहात.

5. स्पर्धा रद्द/बदल

हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलली गेल्यास आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. अशा परिस्थितीत नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही.

6. वर्तन संहिता

सर्व सहभागींनी खेळाची भावना राखणे आणि आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अयोग्य वर्तन केल्यास सहभागी अपात्र ठरविला जाईल.

7. वैयक्तिक माहिती

नोंदणीच्या वेळी दिलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि फक्त या स्पर्धेशी संबंधित कामासाठी वापरली जाईल. तुमची माहिती तृतीय पक्षांना विकली किंवा शेअर केली जाणार नाही.

8. संपर्क माहिती

कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा:

  • For Daud info Mandar Nanoti 7020823980
  • For Technical information Contact Shri Atul Patil - 7769963554
  • पत्ता: गुलशन मार्केट जवळ, बडनेरा रोड, अमरावती

नोंदणी माहिती

नोंदणीमध्ये समाविष्ट आहे:

  • BIB नंबर
  • इव्हेंट जर्सी
  • फिनिशर मेडल
  • सर्टिफिकेट
  • रिफ्रेशमेंट
आता नोंदणी करा
Marathon Registration

स्पर्धा मार्ग व अन्य तपशीलाकरिता कार्यालयाशी संपर्क करावा

संपर्क माहिती

ईमेल

info@signifytech.in

फोन For Daud info Mandar Nanoti 7020823980 For Technical information Contact Shri Atul Patil - 7769963554

पत्ता

गुलशन मार्केट जवळ, मंत्री मोटर्स समोर

राजापेठ चौक रोड, बडनेरा रोड

अमरावती, महाराष्ट्र